मुंबई : सेलिब्रिटींच्या आयुष्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. कलाकार मंडळी घरात एकमेकांशी, किती मोकळेपणाने वागत असतील, याचं कुतूहल सर्वांनाच असतं. काही सेलिब्रिटींवर त्यांच्या चाहत्यांच्या सतत नजरा असतात.


बच्चन कुटूंबाची सून ऐश्वर्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानायक अमिताभ बच्चन यांचं कुटूंब तर चाहत्यांसाठी नेहमीच विशेष आहे. बच्चन कुटूंबाची सून ऐश्वर्या आणि महानायक बच्चन यांच्या नात्याची अनोखी आणि सुरेख किनार पाहायला मिळाली.


पुरस्कार सोहळ्यातून बाहेर येताना


अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्याला,  एका पुरस्कार सोहळ्यातून बाहेर येताना पत्रकारांनी गाठले.  ऐश्वर्या आणि बिग बी या दोघांनाही पुरस्कार मिळाले होते. या सर्व उत्साही वातावरणात ज्यावेळी बिग बी आपल्याकडेच येत आहेत, हे ऐश्वर्याने पाहिले आणि ती उत्साहीपणे व्यक्त झाली. 


नात्याची सुरेख किनार...


ऐश्वर्या म्हणाली, अमितजी खूप चांगले आहेत... 'ही इज द बेस्ट', असे म्हणत तिने त्यांना मिठीच मारली. 


तेव्हा बिग बींनीसुद्धा आपल्या सुनेला अगदी अनोख्या अंदाजात म्हटलं , 'असं आराध्यासारखे वागू नकोस'.