मुंबई :  बिग बॉस सिजन ११ ची विजेती शिल्पा शिंदे आता सुनील ग्रोवरसोबत क्रिकेट बेस्ड कॉमेडी शो धना धन मध्ये काम करत आहे. या शोमध्ये सुनील-शिल्पाची जोडी लोकप्रिय ठरत आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. आता या दोघांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.बिग बॉसमध्ये अनेकदा वादात अडकलेली शिल्पा शिंदे हिना खानवर मात करुन अखेर विजयी ठरली. यामध्ये तिला ४४ लाखांची रक्कम मिळाली. या रक्कमेच काय करणार याबद्दल तिने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलयं. ही रक्कम तिने गुंतवून ठेवण्याचा विचार केल्याचे तिने सांगितले. मालदा येथे प्रॉपर्टीमध्ये ती आपली ही रक्कम गुंतवणार आहे. पण तो बिग बॉसमधून जिंकलेल्या रक्कमेतून नाही तर इतर स्वकमाईतून घेतल्याचे तिने सांगितले.


आधीच मिळाली रक्कम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बिग बॉस' ची ऑफर येण्याआधीच 'भाभीजी घर पै है' च्या निर्मात्यांकडून तिला ही रक्कम मिळाली होती. तो पेमेंट घेतल्यानंतर ती 'बिग बॉस'मध्ये गेली. 'तिथून परतल्यानंतर मी खूप सारं पेपर वर्क केल. ज्यामुळे लोकांना वाटतय की 'बिग बॉस' जिंकून मिळालेल्या पैशातून मी घर घेतलय' असं तिने सांगितलं. 


जेष्ठांसाठी घर बांधणार 


जर मी शो जिकंले तर पप्पांच्या आठवणीत लोकांची मदत करेन असं मी आधीपासून ठरवल्याचं ती सांगते. आता मी हा शो जिंकली आहे. यातून ज्येष्ठ नागरिकांसाठी घर बनविणार आहे. वयस्करांना स्वत:बद्दल काही अपेक्षा नसतात. फक्त आपल्याशी बोलाव अस त्यांना वाटत असत. पण आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त असतो की आपल्याला वयस्करांशी बोलायला वेळ नसल्याचेही तिने सांगितले.