मुंबई : 'बिग बॉस'चा ११ वा सीझन सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्याभरातच या सीझनसोबत ट्विस्टही सुरू झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या पडद्यावरील या शोसोबत काही वाद होणं हे ओघाने येतेच. 


पहिल्याच आठवड्यात जुबैर खान आणि सपना चौधरीमध्ये वाद रंगला. त्याचे पडसाद आठवडाभर घरात उमटले. आठवड्याच्या शेवटी जुबैर खानला त्याच्या वागणुकीबददल शोचा सूत्रसंचालक सलमान खानने खडेबोल सुनावले. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार जुबैर खान सध्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे.


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार जुबैरने झोपेच्या गोळ्या घेतल्या. या गोळ्यांचा ओव्हर डोस झाल्याने जुबैरची शोमधून तात्काळ एक्झिट करून रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे. 
जुबैरने झोपेच्या गोळ्या का घेतल्या हे अजुनही स्पष्ट झालेले नाही. मात्र शनिवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये सलमान खाने जुबैरची हजेरी घेतली होती. 


जुबैर सोबतच बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनाही सलमान खानने त्यांच्या वागणुकीची जाणीव करून दिली होती.