मुंबई: 'बिग बॉस तेलगू 1' भांगाचे सूत्रसंचालन ज्युनिअर एनटीआरने केले होते. तेव्हा हा सीझन चांगलाच चर्चेत होता. सीझनचा टिआरपी सुद्धा अव्वल स्थानी होता. काही कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे ज्युनिअर एनटीआरने 'बिग बॉस' च्या दुसऱ्या भागाचे सूत्रसंचालन केले नव्हते. तर तेव्हा या संधीचे सोने अभिनेत्री नानी ने केले होते. सूत्रांच्या सांगण्यानुसार 'बिग बॉस तेलगू 3' चे सूत्रसंचालन करण्यासाठी ज्युनिअर एनटीआरनेला अप्रोच करण्यात आले आहे. त्यासाठी त्याला निर्मात्यांनी मोठ्या मानधनाची ऑफर दिली आहे. ज्युनिअर एनटीआरला सहा कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘आरआरआर' सिनेमासाठी  एनटीआर आणि राम चरण विशेष मेहनत घेत आहेत. सिमेमाच्या चित्रीकरणासाठी एक वेगळे गाव साकारण्यात येणार आहे. 1920 हा साल लक्षात घेवून या गावाची रुपरेषा साकारण्यात येणार आहे. सिनेमाचे बजेट 300 कोटींचे आहे. 



 


दिग्दर्शक एस. एस. राजमौली साऊथ इंडस्ट्रीतील दर्जेदार कलाकार आहेत. 'बाहुबली' आणि  'बाहुबली 2' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. दिग्दर्शक एस. एस. राजमौली सध्या त्यांच्या ‘आरआरआर' सिनेमामध्ये व्यग्र आहेत. दिग्दर्शक एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर' सिनेमात आभिनेत्री परिणीती चोप्रा झळकणार आहे. तिच्यासोबत तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.