मुंबई : बिग बॉस मराठी' या रिएलिटी शोचा वेगळा ऑडियन्स आहे. नुकतंच या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीजनची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे या आगामी सीजनमद्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावाबाबत देखील उत्सुकता शिगेला पोहचली आहे.बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अनेक कलाकारांच्या नावाच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशातच आता कार्यक्रमात टेलिव्हिजनवरील एक प्रसिध्द सेलिब्रिटी कपल दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र या जोडीचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जातंय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही जोडी म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता सुयश टिळक. अभिनेत्री अक्षया देवधरने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून पाठक बाई साकारत अख्या महाराष्ट्राची मनं जिंकली. तर सुयश 'का रे दुरावा' या मालिकेतून घराघरांत पोहोचला. 



या दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली कधी दिलीच नाही, पण एकमेकांसोबतचे फोटो ते नेहमी शेअर करायचे. चाहत्यांची देखील ही जोडी हळूहळू फेवरेट बनली होती.या दोघांच्या ब्रेकअपची बरीच चर्चा रंगली.अक्षया आणि सुयशच्या ब्रेकअपमुळे चाहते बरेच नाराज झाले. सोशल मिडीयावरुन त्यांनी एकमेकांना अनफॉलो सुध्दा केलं होतं. 


त्यामुळे आता ही जोडी खरंच जर बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीजनमध्ये झळकली तर नेमकं पुढे काय घडेल याची चाहत्यांना उत्सुकता सगळ्यांनाच आहे.