मुंबई : बिग बॉसचा ११वा सीझन पुन्हा एकदा सलमान खान होस्ट करणार हे ठरल्यापासूनच तो या शोसाठी किती पैसे घेतो यावरून चर्चा होत आहे. गेल्यावर्षी अशीही चर्चा झाली होती की, पैशांच्या वादामुळे सलमान खान हा शो सोडून जाणार होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा एकदा तो या शोसाठी किती पैसे घेतो यावर चर्चा होत आहे. सलमान खान या शोच्या एका एपिसोडसाठी चक्क ११ कोटी रूपये घेत आहे.  बिग बॉसच्या ११व्या सीझनच्या लॉन्चवेळी राज नायक यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ‘इतक्या स्वस्तात सलमान खान मिळत नाही’. 


याआधी सलमान खानने या शोच्या १० पैकी ८ सीझनमध्ये सलमान खान यानेच होस्ट केलं होतं. सलमान खानला हा शो इतर शोजपेक्षा अधिक कठिण वाटतो. बिग बॉसच्या ११व्या सीझनची सुरुवात १ ऑक्टोबरपासून होणार आहे. यंदा या शोची थिम शेजारी ही असणार आहे. या शोमध्ये यंदा येणा-या सेलिब्रिटींमध्ये हिना खान, शिल्पा शिंदे, विक्रांत सिंह राजपूत आणि गौरव गेरा यांच्या नावांचीही चर्चा आहे.