मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Khan) सीमा शुल्क विभागानं 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शाहरुखला रात्री उशिरा मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागानं नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थांबवलं होतं. शाहरुख रात्री शारजाहहून परत येत असताना मुंबई विमानतळावर त्याला अडवण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानतळावर शाहरुख आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांना तासभर थांबवण्यात आले होते. तर असेही म्हटले जात आहे की शाहरुख नाही तर त्याचा बॉडीगार्ड रवी आणि त्याच्या टीमला थांबवून ठेवले. सीमा शुल्क विभागानं शाहरुखला अडवण्याचे कारण म्हणजे लाखो रुपयांच्या घड्याळ भारतात सीमाशुल्क न भरता आणणे. शाहरुखची चौकशी झाल्यानंतर सुमारे 6.83 लाख दंड भरून सर्वंना सोडण्यात आले. (big breaking bollywood Actor Shah Rukh Khan stopped by customs officials at mumbai airport) 


पाहा शाहरुखचा व्हिडीओ -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान त्याच्या टीमसह खासगी चार्टर विमान व्हीटीआर-एसजीने मुंबईला परतला. दुबईत एका बुक लॉन्च कार्यक्रमात ते पोहोचले होते. पहाटे 12.30 च्या सुमारास विमानतळाच्या T3 टर्मिनलवरील रेड चॅनल ओलांडत असताना सीमा शुल्क अधिकाऱ्यांना शाहरुख आणि त्याच्या टीमच्या बॅगमध्ये सुमारे 18 लाख रुपयांची महागडी घड्याळे सापडली. बॅगेत अनेक घड्याळांचे रिकामे बॉक्सही होते. या सर्वांची सीमा शुल्क न भरल्यामुळे शाहरुख आणि त्याच्या टीमला चौकशीसाठी बसवण्यात आले.


हेही वाचा : Bipasha Basu Baby: बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरला कन्या रत्न!


रिपोर्ट्सनुसार, शाहरुखच्या टीमकडून रोलेक्स घड्याळांचे 6 बॉक्स, 8 लाख रुपयांचे एक Espirit ब्रँडचे घड्याळ, ऍपल सीरीजची घड्याळं आणि Babun & Zurbk घड्याळे देखील मिळाली आहेत. या घड्याळांची एकूण किंमत 17 लाख 56 हजार 500 रुपये असल्याचे सीमाशुल्क विभागाच्या निदर्शनास आले. तासाभराच्या प्रक्रियेनंतर शाहरुख आणि पूजा ददलानी यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली, तर अभिनेत्याचा बॉडीगार्ड रवी आणि टीमच्या इतर सदस्यांना तिथेच थांबवण्यात आले.