मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी कोविड योद्धे गेल्या वर्षापासून लढत आहे. अशात वीरांना प्रोत्साहित करण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी एक कविता सादर केली आहे. कविता सादर  करताना बिग बींनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. बिग बींनी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेली एक कविता सादर केली आहे. सध्या बिग बींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'धनुष्य उठा प्रहार कर, तू सब से पेहला वार कर...' व्हिडिओ ते म्हणत आहे की, 'एक युद्धा कधीही हार मानत नाही. आपल्या ताकदीने तो मैदानात उतरतो आणि विजय मिळवतो.' असं म्हणत त्यांनी कोरोना वीरांना प्रोत्साहित केलं आहे. 


देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना बिग बींनी  सर्वांचं  मनोबळ वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. देशातील कोरोनाची स्थिती अत्यंत भयंकर आहे. कोरोना रूग्णांचा आकडा तर वाढतचं आहे. पण मृतांची संख्या देखील फार मोठी आहे. अशा परिस्थितीत  बिग बींचा हा व्हिडिओ सर्वांच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण करणारा आहे.