मुंबई : अभिनेता रणवीर सिंग स्टारर '83' चित्रपटाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. दिग्दर्शक कबीर खान दिग्दर्शित '83' चित्रपटात रणवीर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेतून  चाहत्यांच्या भेटीस आला. त्याच्या लूकपासून ते अभिनय आणि खेळापर्यंत सर्व काही प्रचंड प्रभावी दिसत आहे. '83' मध्ये भारताचा पहिला विश्वचषक विजय दाखवण्यात आला. त्यामुळे '83'नंतर रणवीर सिंगला अनेक बायोपिक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. रणवीरच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा बदल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द रणवीर सिंगने या गोष्टीचा खुलासा केला आहे. रणवीरला ऑफर करण्यात आलेल्या  5 चित्रपटांपैकी एक चित्रपट तीन क्रीडापटूंवर आधारित आहे. याबद्दल रणवीरने एका मुलाखतीत सांगितले की, 'मी सध्या ज्या 5 बायोपिकबद्दल बोलत आहे. यातील तीन खेळांशी संबंधित आहेत.'


काही दिवसांपासून रणवीर paraplegic swimmer चा बायोपिक करणार असल्याचं समोर येत आहे. अशा परिस्थितीत रणवीर सिंगला विचारण्यात आले की, ऑफर केलेले कोणतेही चित्रपट  paraplegic swimmerवर आधारित आहेत का? यावर रणवीर म्हणाला, “मला असं वाटतं की आपण प्रतीक्षा करावी आणि वेळ द्यावा. हे पाचही बायोपिक बनवण्याचे वेगवेगळे टप्पे करत आहेत.'


रणवीर सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करत आहे. यात रणवीरची अभिनेत्री आलिया भट्ट आहे. रणवीरकडे रोहित शेट्टीचा 'सर्कस' चित्रपटही आहे. यासोबतच तो 'जयेशभाई जोरदार'मध्येही दिसणार आहे.