मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या आगामी 'शेरो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या सेटवर शुटींग दरम्यान मारामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. सेटवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत सनी लिओनी देखील स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण सेटवर समोर आलेल्या व्हिडिओमुळे सेटवर नक्की काय प्रकार घडला याबाबत जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. पण हा व्हिडिओ सेटवरील खऱ्या मारामारीचा नसून, एका सीनसाठी सनी फायटींग करताना दिसत आहे.


सनीच्या तमिळ सिनेमाचं शुटींग सुरु


सनीचा आगामी 'शेरो' नावाचा तामिळ चित्रपट आहे. चित्रपटांमध्ये अनेकदा ग्लॅमरस आणि बॉम्बशेल भूमिकेत दिसणारी सनी या चित्रपटात पूर्णपणे नवीन अंदाजात दिसणार आहे. अशा भूमिकेत ती यापूर्वी कधीही दिसलेली नाही. सनीची ही स्टाईल पाहून तिचे चाहते खूप उत्साहित आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सनीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी तिच्या सहकाऱ्यांसोबत मजा करताना दिसत आहे आणि तिच्या चाहत्यांना सनीचा हा मजेदार मूड खूप आवडला आहे आणि अवघ्या 4 तासात तिच्या या व्हिडिओवर 1 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.