मुंबई : अभिनेता भाऊ कदम हा मराठीतील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता आहे. फार कमी वेळात त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर भाऊचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. भाऊने अवघ्या काही वेळात सोशल मीडियावरही राज्य करायाला सुरुवात केली आहे.  सोशल मीडियावर नेहमी अभिनेता सक्रिय असतो. भाऊने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होऊ लागते. आता पुन्हा एकदा भाऊ संदर्भात एक मोठी बातमी सोशल मीडियावर येत आहे. झी मराठी वाहिनीवरील फू बाई फु या कार्यक्रमातून भाऊ घरा-घरात पोहचला. मात्र अभिनेत्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातूनच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भाऊ यांनी एक पोस्ट शेअर करत एक गुडन्यूज त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. एक पोस्ट शेअर करत भाऊ म्हणालेत की, 500k subscribers 
On the way to Million. त्यामुळे मिलीयनचा टप्पा गाठायचा आहे असं भाऊ यांनी म्हणत ही पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. नुकतेच त्यांचे त्यांच्या युट्यूब चॅनलनर 500k subscribers चा टप्पा पार केला आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 


अनेकांनी भाऊच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर ऐकाने कमेंट करत लिहलंय की, अभिनंदन भाऊ, तर अजून एकाने लिहीलंय की, भाऊ आमच्या यूट्यूब चॅनल ची advertising करता का plz तर अजून एकाने लिहीलंय, हे तर काहीच नाही आता तर एक मिलीयन करायचे आहे. खूप प्रेम आणि सपोर्ट. तर अजून एकाने लिहीलंय, भाऊ भाऊ अभिनंदन सर. तर अजून एकाने लिहीलंय, खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. तर अनेकांनी त्यांना अभिनंदन म्हणत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



'चला हवा येऊ द्या' या (Chala Hawa Yeu Dya) कॉमेडी शोने गेल्या काही वर्षात प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. भाऊ प्रोफेशनल आयुष्याप्रमा त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही नेहमीच चर्चत असतो.  'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शो च्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam) घराघरात पोहचला आहे. भाऊने आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रांचं भरभरुन मनोरंजन केलंय. ज्याने खळखळून लोकांचं मनोरंजन केलं, भाऊ हा मराठी इंडस्ट्रीतला असा हिरो आहे ज्याने सुरुवातीच्या दिवसांत खूप संघर्ष केला आणि आज तो त्याच्या अभिनयाच्या जोरावर उंचीच्या शिखरावर पोहचला आहे. ८ डिसेंबरला भाऊचा आगामी सिनेमा एकदा येऊन तर बघा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर करुन गेलो गाव हे नाटक सध्या भाऊ गाजवत आहे.