जयपूर : अखेर तो क्षण आलाच, जेव्हा कतरिना कैफ ही विकी कौशलच्या पत्नीच्या रुपात समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या अनेक दिवसांपासून ही जोडी लग्न करणार असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. आता मात्र अखेर त्यांच्या लग्नातील फोटोच व्हायरल झाला आहे. 


राजेशाही थाट नेमका काय असतो, हेच हे फोटो पाहताना लक्षात येत आहे. बऱ्याच फॅन पेजेसवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 


सर्वच स्तरांतून विकी आणि कतरिनावर शुभेच्छांचा वर्षावही करण्यात येत आहे. अनेक नियम, माध्यमांवरील बंदी असतानाही या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे चाहत्यांमध्ये भलताच आनंद पाहायला मिळत आहे. 








कतरिनाच्या अधिकृत फोटोंची प्रतीक्षा असतानाच आता लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये कतरिनानं लाल रंगाचा लेहंगा घातल्याचं दिसत आहे. तर, विकी आयव्हरी शेडमधील एका सुरेख अशा शेरवानीमध्ये दिसत आहे. त्याच्या डोक्यावर फेटा दिसत असून, दोघांच्याही गळ्यात हार दिसत आहेत.