आताची सर्वात मोठी बातमी | अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्यकडून घटस्फोटाची घोषणा
4 वर्षांनंतर समंथा आणि नागा चैतन्यकडून अखेर नातं संपवण्याची घोषणा, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट पाहा काय म्हणाले
मुंबई: दक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी घटस्फोट घेत असल्याची अखेर घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून हे कपल घटस्फोट घेणार असल्याच्य़ा चर्चेत होतं. अखेर या दोघांनीही घटस्फोट घेणार असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केलं आहे.
समंथा आणि नागा चैतन्यच्या या निर्णयामुळे अनेक चाहत्यांची निराशा देखील झाली आहे. पती-पत्नी या बंधनातून वेगळं झालो असलो तरी एक चांगले मित्र म्हणून आम्ही कायम राहू अशा आशयाची पोस्ट करत या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
नागा चैतन्य आणि समंथा यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. 4 वर्षांनंतर त्यांनी आपल्या या नात्यातून मोकळं होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटानंतर दोघेही वेगळे झाले तरी एक मित्र म्हणून ते कायम असतील असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
समंथाने फेमिनाच्या 40 सर्वोत्तम महिलांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. ज्यासाठी अभिनेत्रीनं आभारही मानले आहेत. Femina's Fabulous 40च्या वतीने समंथाला टॅग करत, असं ट्विट करण्यात आलं आहे की, 'चार फिल्मफेअर पुरस्कार, दोन नंदी पुरस्कार, चार दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन सिनेमा पुरस्कार मिळवलेल्या सामंथा तामिळ आणि तेलगू सिनेसृष्टीत फेवरेट लिस्टमध्ये आहेत.