मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचं निधन झालं आहे. कल्याणीला कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा येथे डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच कल्याणीनं 'प्रेमाची भाकरी' या नावानं एक हॉटेल सुरु केलं होतं. हे हॉटेल बंद करून कल्याणी हॉटेलमधून बाहेर पडत होती. त्यावेळी डंपरनं धडक दिली आणि यावेळी कल्याणीचा मृत्यु झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : Big News: 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीचं अपघाती निधन...


कल्याणीनं मृत्युच्या काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत कल्याणी तिच्या हॉटेलमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'आता येणारी वेळचं सांगणार आम्ही किती किंमती होतो...', कल्याणीनं दिलेल्या या कॅप्शनमुळे तिला आधीच तिच्या निधनाची कल्पना आली होती का अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत. कल्याणीचा हा व्हिडीओ आणि कॅप्शननं सगळ्यांना भावूक केले आहे. (big news tujhyat jeev rangala fem actress passes away shocking shared a video went viral) 


पाहा अभिनेत्रीची पोस्ट -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, कल्याणीचा मृत्युनंतर सोशल मीडियावर आणखी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरत आहे आणि ती म्हणजे कोल्हापूर - सांगली या महामार्गावर असलेल्या खड्डे. या महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. अनेक ठिकाणी तर पूर्ण रस्ता न बनवता पॅच लावले आहेत. त्यानं काय होणार असं म्हटलं जात आहे. विविध संघटनांकडूनही या रस्त्यासाठी आंदोलने करण्यात आली आहेत.