मुंबई : अभिनेता वरूण धवनने गेल्या वर्षी 24 जानेवारी रोजी लग्न केलं. वरूणने गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न केलं. आता लग्नाच्या एक वर्षानंतर त्याने हळदीचे आणि लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. वरूणच्या लग्नाचे आणि हळदीचे कधीही न पाहिलेले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जानेवारी 2021साली वरूणने लहानपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत लग्न केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा कधीचं झाली नाही. नताशा आणि वरूण यांना अनेकदा पार्टी किंवा एखाद्या कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. लग्नानंतर देखील दोघे एकत्र क्लालिटी टाईम घालावताना दिसतात. यादरम्यानचे फोटोही हे कपल सोशल मीडियावर शेअर करतात.



आता लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर त्याने काही फोटो  शेअर केले आहेत. फोटोमध्ये नताशा आणि त्याची केमिस्ट्री दिसून येत आहे. एवढंच नाही तर वरूणने लग्नात मित्रांसोबत व्यतीत केलेले क्षण देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 



दरम्यान, वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची चर्चा 2020 सालापासून पाहायला मिळत होती. जानेवारी 2021 रोजी दोघांनी खास लोकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतल्या. या लग्नात काही बॉलिवूड स्टार्सही सहभागी झाले होते. वरुण-नताशाबद्दल बोलायचे झाले तर दोघेही बालपणीचे मित्र आहेत.