अभिनेता रणवीर सिंहबाबत मोठी अपडेट समोर; लवकरच घेणार मोठा ब्रेक?
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही चाहत्यांची लाडकी जोडी आहे. नेहमी ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
मुंबई : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने लग्नाच्या सहा वर्षानंतर त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात या जोडीने गोड बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. ही लवकरच पालक होणार आहेत. ही गुडन्यूज समोर येताच या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. तर या पॉवर कपलसोबत जोडलेलं एक अपडेट चर्चेत आहे. यादरम्यान रणवीर सिंहच्या आगामी शेड्यूलवर मोठी माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार सुपरस्टार, वडिल झाल्यानंतर मोठ्या ब्रेकवर जाण्याच्या योजना बनवत आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यावर्षाच्या शेवटपर्यंत आपल्या पहिल्या बाळाच्या प्रतिक्षेत आहेत. असं म्हटलं जातंय की, अभिनेता वडिल झाल्यानंतर आपल्या बाळासोबत आणि पत्नीसोबत क्वालिटी टाईम स्पेण्ड करण्यासाठी ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाने आपल्या सगळ्या कमीटमेंट्स पुर्ण केल्या आहेत आणि आता तिने ब्रेकची योजना आखली आहे. तर रणवीर सिंहने 'डॉन 3', 'शक्तिमान' आणि आदित्य धरचे एक्शन सिनेमा सुरु करण्याआधी कोणतेच अजून प्रोजेक्ट न घेण्याची योजना तिने केली आहे. ज्यामुळे तो त्याच्या पत्नी आणि मुलाला जास्तीत जास्त वेळ देवू शकतो.
2 मार्च 2024ला अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवशी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मेंस दिला. त्याने 'दिल धड़कने दो' 'गल्लां गूडियां'वर जबरदस्त डान्स केला. 29 फेब्रुवारी, 2024 ला दीपिका आणि रणवीरने लवकरच पैरेंट्स होणार असल्याच्या बातमीवर त्यांच्या चाहत्यांना खूष केलं आहे.
दीपिका-रणवीरने एकत्र आपल्या इन्स्टाग्राम अकाऊन्टवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोत निळ्या आणि गुलाबी रंगाचे छोटी चप्पल, टोपी, फुगे दाखवले गेले. ज्यानंतर चाहत्यांमध्ये जुळ्या मुलांच्या जन्माबाबत चर्चा सुरु आहे. फोटोसोबतच एक पोस्ट लिहीली होती. ज्यामध्ये खुलासा केला गेला आहे की, त्यांचं पहिलं बाळ सप्टेंबर 2024 मध्ये येण्याची अपेक्षा आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह 'राम लीला' सिनेमा दरम्यान एकमेकांच्या जवळ आले. यानंतर 14 नोव्हेंबर 2018 साली इटलीमध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली. दीपिका-रणवीरने इटलीमधील लेक कोमो येथील 700 वर्ष जुना व्हिला डेल बालबियानेलोमध्ये कोंकणी आणि नंतर सिंधी रीति-रिवाजने लग्न केलं.