मुंबई : 'बिग बॉस' या बहूचर्चीत टीव्ही शोमधून स्पर्धक अर्शी खानवा जोरदार झटका बसला आहे. त्यामुळे अर्शी खान यापूढे बिग बॉसच्या 11व्या सिजनमध्ये दिसणार नाही.


कामगिरी चांगली पण मते कमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी रात्री प्रसारीत झालेल्या बिग बॉस 11च्या भागात अर्शी खान बाद झाली. घरातील इतर स्पर्धकांच्या तुलनेत अर्शी खान हिला सर्वात कमी मते मिळाली होती. याच मुद्द्याच्या अधारे अर्शी खानला घराबाहेर व्हावे लागले. दरम्यान, अर्शीच्या चाहत्यांना मात्र हा जोरदार झटका असेन कारण, इतर खेळाडूंच्या तुलनेत तिचा परफॉर्मन्स चांगला होता. मात्र, गेल्या काही काळापसून घरातील तिची प्रतिमा काहीशी नकारात्मकही झाली होती. कदाचित याचमुळे चाहत्यांवरील तिचा प्रभाव कमी होऊ शकला असेल.


लव त्यागी, पुनीश शर्मावर प्रश्नचिन्ह


दरम्यान, लव त्यागी आणि पुनीश शर्मा यांच्यासारख्या सदस्यांचे बिग बॉसच्या घरात असणे अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. कारण, दोघे घरात काहीच करत नाहीत. तरीही त्यांना जबरदस्त व्होटींग मिळत आहे. तर, याऊलट अर्शी खान जोरदार परफॉर्मन्स करूनही तिला घराबाहेर व्हावे लागले आहे.


अर्शीच्या जाण्याचे सर्वाधीक दुख: विकास गुप्ताला झाले आहे कारण, हे दोघे घरातील चांगले मित्र होते. तर, तिच्या जाण्यामुळे पुनीश, आकाश आणि शिल्पाला चांगलाच आनंद झाला आहे.