नवी दिल्ली : 'बिग बॉस ११'शो जिंकल्यानंतर शिल्पा शिंदे खूपच आनंदात आहे. सलमानने विजेता घोषित केल्यानंतर शिल्पाच्या फॅन्सचा आनंद गगनात मावणारा नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानदेखील या निर्णयाने आनंदी दिसत होता. त्यामूळे शिल्पा आता 'भाभीजी घर पै है' मधील भाभीजी म्हणूनच नव्हे तर 'बिग बॉस ११' ची विजेता म्हणून ओळखली जाणार आहे. 


फॅन्स ना म्हणाली थॅंक्स 



घरातून बाहेर आल्यावर तिला जेव्हा कळाले की, देशभरातील जनतेचा सपोर्ट मिळालाय, त्यावेळी तिने व्हिडिओ शेअर केला.


या व्हिडिओत तिने सर्वांचे आभार मानले. 


शिल्पा बिग बॉस ची अशी पहिली स्पर्धक आहे जिच्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्विट करण्यात आले.