Bigg boss 11 विजेती शिल्पा शिंदेला बड्या कंपनीच्या ब्रॅन्ड अम्बॅसेडरपदाची ऑफर
रविवारी रात्री बिग बॉस 11 या पर्वाचा अंतिमसोहळा रंगला.
मुंबई : रविवारी रात्री बिग बॉस 11 या पर्वाचा अंतिमसोहळा रंगला.
विकास, पुनीष, हीना आणि शिल्पा शिंदे यांच्यामध्ये अंतिमसोहळा रंगला. अखेर घरात आणि घराबाहेरही सुरूवातीपासूनच प्रसिद्ध असलेल्या शिल्पा शिंदेने विजेतेपद पटकावले आहे.
शिल्पा शिंदेला ऑफर
शिल्पा शिंदे बिग बॉसची विजेती झाल्यानंतर काय करणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात आले आहेत. काही रिपोर्टसच्या मते शिल्पा हिंदी टेलिव्हिजनपासून दूर जाणार आहे. शिल्पाला हिंदी सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा आहे.
पाककौशल्यामुळे बिग बॉसच्या घरात लोकप्रिय असलेल्या शिल्पाला त्या संबंधित एक ऑफर मिळाली आहे. बॉलिवूडलाईफ़च्या माहितीनुसार प्रसिद्ध कणकेच्या पीठाच्या कंपनीची ब्रॅन्ड अॅम्बॅसेडर होण्यासाठी शिल्पा शिंदेला ऑफर मिळाली आहे. या ऑफरचे डिटेल्स खुले करण्यात आलेले नसून शिल्पा ही ऑफर स्वीकारणार का ? हे पहावे लागेल.
शिल्पा शिंदेच्या लोकप्रियतेचा फायदा घेत तिला अनेक प्रोजेक्टच्या ऑफर येत आहेत. Bigg Boss चे विजेते आज काय काम करतायंत ?
शिल्पाने मानले फॅन्सचे आभार
सुरूवातीपासूनच शिल्पा शिंदेचे फॅन्स तिच्या पाठीशी ठाम उभे होते. ट्विटरही शिल्पा शिंदेच्या समर्थनार्थ अनेक हॅशटॅग ट्रेन्ड करण्यात आले होते. चाहत्यांच्या प्रेमामुळे भारावलेल्या शिल्पा शिंदेनेही विजेतेपदाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच चाहत्यांचे आभार मानले आहेत. ट्विटरवर शिल्पा शिंदेने खास व्हिडिओदेखील शेअर केला आहे.