मुंबई : बिग बॉस 12 मध्ये लोकप्रिय भजन सम्राट गर्लफ्रेंड जसलीन मथारूसोबत घरात राहतात. जसलीन अनूप जलोटा यांची शिष्या आहे. ती त्यांच्याकडून संगीत शिकत आहे. यामुळे रिअॅलिटी शो बिग बॉस सिझन 12 मध्ये रोमांच दररोज वाढत आहे. या बिग बॉसच्या घरात अनूप जलोटा आणि जसलीन मथारू अतिशय लोकप्रिय होत आहे. दोघांनी आपल्या नात्याची ओळख जगासमोर या शोमधूनच आणली. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनूप जलोटा यांच्यासोबत 3 वर्षे जसलीन रिलेशनशिपमध्ये असल्याचा तीने स्वतः खुलासा केला. तिच्या या वक्तव्यामुळे कुटुंबियांना देखील धक्का बसला. जसलीन पंजाबी कुटुंबातील आहे. अनूप जलोटा आणि जसलीन यांच्यात 37 वर्षांच अंतर आहे. अनूप जलोटा यांच वय आता 65 वर्षे आहे तर जसलीन फक्त 28 वर्षांची आहे. 




आपल्या बोल्ड अंदाजात असलेली जसलीन बिग बॉसमध्ये आपला जलवा दाखवत आहे. शोमध्ये एका टास्क दरम्यान अनूप जलोटाने रोशमीला पूलमध्ये जाण्यास सांगितलं. मात्र तेव्हा त्यांची गर्लफ्रेंड जसलीन पूलमध्ये उतरली. रेड बिकिनीमध्ये जसलीनचा सेक्सी अंदाज पाहायला मिळाला. हे सगळं बघताच अनूप जलोटा देखील स्तब्ध झाले. जसलीनचा हा व्हिडिओ Voot च्या अॅपवर शेअर करण्यात आला.