मुंबई : 'बिग बॉस 15' मध्ये, लोकं अभिजित बिचुकलेला ट्रॉफीचा कमकुवत स्पर्धक मानतात. मात्र तो त्याच्या अतरंगी स्वभावामुळे आणि असभ्यपणामुळे चर्चेत असतो. 'बिग बॉस 15' चा एक नवीन प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तेजस्वी प्रकाशने अभिजीतबद्दल असा खुलासा केला आहे, जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बिग बॉस 15' च्या या प्रोमोमध्ये स्पर्धक एकमेकांबद्दल खूप मनोरंजक आणि आश्चर्यकारक खुलासे करताना दिसत आहेत. खरंतर, जेव्हा स्पर्धकांना 'बस्टिंग रिपोर्टिंग' अंतर्गत त्यांच्या टीममेट्सबद्दल काहीतरी पर्दाफाश रिपोर्टिंग’ करण्यास सांगितलं गेलं तेव्हा तेजस्वी प्रकाशने सांगितलं की अभिजीत बिचुकलेने एका म्युझिक व्हिडिओसाठी 6 तासांचं किसींग सीन दिले होते.


रश्मी देसाई यांनी अभिजीतवर केले आरोप 
प्रोमो व्हिडिओमध्ये काही मीडिया व्यक्तीही दिसत आहेत. जे कुटुंबातील सदस्यांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. दरम्यान, रश्मी देसाई अभिजीतबद्दल सांगते की, त्याचा स्त्रियांबद्दलचा विचार घाणेरडा आहे. टॉवेल उघडतो. किस मागतो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिजीतने गेस्टसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली
अभिजीत रश्मीवर चिडतो आणि तिच्यावर त्याची प्रतिमा डागाळल्याचा आरोप करतो. यावर रश्मी त्याला इडियट म्हणते. तेव्हा अभिजीत तिला सांगतो की तुझं संपूर्ण कुटुंब मूर्ख आहे. जेव्हा अभिजीत शोमध्ये आलेल्या गेस्टसोबत चुकीचं बोलू लागतो तेव्हा सलमान खान त्याच्यावर चिडतो आणि त्याला गप्प करतो.