मुंबई : बिग बॉस 15 चा नुकताच नवीन सिझन सुरू झाला आहे. बिग बॉस म्हटलं की, वाद हा आलाच. बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटी स्टेटस, बॉडी-शेमिंग आणि वय-शेमिंग सारख्या घटना घडत आहेत. अवघ्या दोन दिवसांत घरातील एक प्रकरण चांगलच गाजलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही अभिनेता करण कुंद्राने शमिता शेट्टीला 'आंटी' म्हटले. जेव्हा त्याने घोषित केले की, तो कोणालाही हिनवणार नाही. शमिता शेट्टीची आई या प्रकरणावर चांगलीच भडकली आहे. शमिता शेट्टीची आई सलमान खानला 'बिग बॉस 15' मध्ये झालेल्या एज- शेमिंग बदल्यात कठोर कारवाई करण्याची मागणी करते. ही बातमी आजच्या टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. 


निशांत भट्टने संपूर्ण परिस्थितीबद्दल मौन बाळगले. त्याने करण कुंद्राला सांगितले नाही की, त्यानेच हा शब्द वापरला. शमिता शेट्टीला अशा पद्धतीने हाक मारल्याबद्दल चाहते आता करणवर खूप नाराज आहेत. चाहत्यांनी असेही निदर्शनास आणले की, त्याची जुनी मैत्रीण अनुषा दांडेकर स्वत: त्याच्यापेक्षा काही वर्षांनी मोठी होती.


या परिस्थितीवर प्रतिक्रिया देणारी आणि करणवर सोशल मीडियावर टीका करणारी पहिली अभिनेत्री म्हणजे कश्मीरा शाह. कश्मीरा म्हणाली की लोकांनी यात गुंतणे खूपच थंड आहे.



शमिता शेट्टीच्या आईने आता सोशल मीडियावर करणवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, वयावर आणि शारिरीक भागावर टिपणी करणे हे अतिशय चुकीचे आहे. सुनंदा शेट्टीने आता होस्ट सलमान खानला 'वीकेंड का वार' दरम्यान या प्रश्नावर उत्तर द्यावं ही विनंती केली आहे.