मुंबई : बिग बॉसच्या 16 व्या (bigg boss 16) सीझनला सुरूवात झाली आहे. या सीझनमधील अनेक स्टार्सबद्दल विविध माहिती समोर येत आहे. त्यात आता एका अभिनेत्री आणि राजकारणी असलेल्या बिग बॉस स्टारबद्दलची  (bigg boss) माहिती समोर आली आहे. ही अभिनेत्री खुपच ग्लॅमरस आहे. तिचं सोशल मीडिया अकाऊंट ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओने भरलेले आहे. नेमकी ही अभिनेत्री कोण आहे, ते जाणून घेऊय़ात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या (bigg boss) शोमध्ये एकापेक्षा एक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री-राजकारणी अर्चना गौतम (Archana Gautam) . ही अभिनेत्री बिकिनी गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच तिला साऊथच्या चित्रपटांची सनी लिओन देखील म्हटलं जातं. 



अनेक किताब जिंकली?
अर्चना गौतमने 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेशचा किताब जिंकला होता. यानंतर खऱ्या अर्थाने मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात झाली. यानंतर तिने 2018 मध्ये मिस बिकिनी इंडियाचा किताब जिंकला होता. पुढे अर्चनाने मिस कॉसमॉस वर्ल्ड 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय अर्चना अनेक चित्रपटांपासून पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांपर्यंतच्या म्युझिक व्हिडिओमध्येही ती दिसली होती.


सलमान नवरा आहे?
अर्चना गौतम (Archana Gautam) बिग बॉसच्या (bigg boss 16)या सीझनची सर्वात सुंदर स्पर्धक मानली जातेय. अर्चनाने शोमध्ये बिनधास्त स्वभाव ठेवला आहे.यासह बिग बॉस जिंकणे ही तिचे ध्येय आहे. तसेच अर्चना गौतम म्हणाली होती की ती, सलमान खान तिच्या नवऱ्यासारखा आहे आणि  बिग बॉसच्या घराला ती तिच सासर मानते. याशिवाय घरामध्ये उपस्थित असलेल्या बाकीच्या महिला स्पर्धक तिच्या भावजयासारख्या आहेत. 



कॉग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली
अभिनेत्रीतून राजकारणी बनलेली अर्चना गौतम मूळची उत्तर प्रदेशातील मेरठची आहे. अर्चनाने मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर (राखीव) जागेवरून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांना वाईट पराभवाला सामोरे जावे लागले होते. 


दरम्यान अर्चना गौतम  (Archana Gautam)  बिग बॉस शोमध्ये एन्ट्री मारल्यापासून चर्चेचा विषय ठरली आहे.