`आमची अब्रू जाईल अशा शोमध्ये परत जाणार नाहीस... सासूबाई असं म्हणताच अंकितानं दिलं सडेतोड उत्तर
`बिग बॉस 17` च्या ग्रॅंड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेला पाठिंबा देण्यासाठी तिच्या सासुनं देखील हजेरी लावली होती. मात्र, त्यांनी अंकिताला खडेबोल सुनावण्यास सुरुवात केली.
Ankita Lokhande : 'बिग बॉस 17' च्या ग्रॅंड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेची सासु रंजना जैन लाल यांनी हजेरी लावली होती. रंजना यांनी यावेळी बनारसी साडी नेसली होती. त्या त्यांच्या मोठ्या सुनेसोबत यावेळी पोहोचले होते. सलमाननं प्रेमानं त्यांची मस्करी केली आणि अंकिताशी काही वचन देखील घेतले. विकी जैनची आई शोमध्ये फॅमिली वीकमध्ये देखील पोहोचली होती. ज्यानंतर त्यांचं कुटुंब हे चर्चेत होतं. खरंतर या शोमध्ये अंकिता आणि विकी जैन यांच्यात खूप मोठं भांडण झालं. त्यावरुनचं अंकिताच्या सासुनं तिची सुनावले घेतली. आता ग्रॅंडफिनालेच्या वेळी देखील सगळ्यांसमोर अंकिताच्या सासूनं तिला खडेबोल सुनावले.
अंकितानं या शोमध्ये नवरा विकी जैनसोबत एन्ट्री घेतली होती. मात्र, इथे आल्यानंतर त्या दोघांमध्ये सतत भांडण होऊ लागली होती. अंकितानं विकीवर चप्पल देखील फेकून मारली होती आणि त्यावर हात देखील उगारला होता. मात्र, नंतर अंकिता आणि विकीनं खुलासा केला की हे फक्त मस्करीमध्ये होतं. अंकिताच्या सासरच्या लोकांना हे आवडलं नाही. त्यानंतर फॅमिली वीकमध्ये जेव्हा सासूनं हजेरी लावली होती तेव्हा सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु होती. तर आता विकी आणि त्याची आई दोघेही फिनाले एपिसोडमध्ये पोहोचले होते.
हेही वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकीनं मुलाखत सुरु असतानाच केली तोडफोड; काठी उचलली आणि...
सासुनं केलेलं हे वक्तव्य ऐकूण तिला आश्चर्य झालं. त्यांनी म्हटलं की 'सासु बाई मी तुम्हाला ग्रॅंड फिनालेमध्ये वचन देते की ती कधीच त्यांच्या मुलांशी भांडणार नाही. तर सासु बाई करत असलेलं वक्तव्य मध्येच थांबवत म्हणते की मला इंडस्ट्रीचा भाग होऊन आनंद आणि गर्व वाटतो.'