मुंबई : सध्या बिग बॉस 17 जोरदार गाजत आहे. सगळ्यात वादग्रस्त शोम्हणून या शोकडे पाहिलं जातं. यातील प्रत्येक स्पर्धक कायम चर्चेत असतो. बिग बॉस १७मधील सगळ्यात चर्चेत जोडी म्हणून अंकिता लोखंडे आणि विकी जैनकडे पाहिलं जात. सध्या या दोघांची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. बिग बॉसच्या १७ व्या पर्वाची सध्या अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नुकत्याच या घरात अंकिता आणि विकीला भेटण्यासाठी अभिनेत्रीची आई व सासूबाई (विकी जैनची आई) आल्या होत्या. सध्या 'बिग बॉस'च्या घरात 'फॅमिली वीक' सुरू झाला आहे. दरवर्षी 'फॅमिली वीक'च्या टास्कदरम्यान स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिता विकीची भेट घेतल्यांनंतर विकी जैनची आई रंजना जैन यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यादरम्यान रंजना यांनी बिग बॉसच्या घरातील वातावरण त्याचबरोबर  मुलाच्या व सुनेच्या नात्यावर भाष्यही केलं आहे. पिंकव्हिलाशी साधलेल्या संवादात, विकी अंकितामध्ये सुरु असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे. 
 
अंकिता  विकीच्या नात्याविषयी बोलताना रंजना जैन म्हणाल्या की, ''अंकिताशी लग्न करणं हा विकीचा निर्णय होता. आमचा त्यांच्या लग्नाला पाठिंबा नव्हता. लग्नाचा निर्णय हा सर्वस्वी त्याचा होता, हे लग्न त्याला टिकवायचं आहे त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल आम्हाला काहीही देणंघेणं नाही. टीव्हीवर आम्ही सगळ्या गोष्टी पाहतो तरीही दोघांना काहीच बोलत नाही. ‘बिग बॉस’ संपल्यावर त्या दोघांचं नातं सुधारण्यासाठी विकी जरुर प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे. विकी-अंकिताने आता गेमपेक्षा जास्त त्यांच्या नात्यावर लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांच्यामधील भांडणं सगळ्यांनीच पाहिली पण, आता त्या दोघांचं प्रेम सगळ्यांना दिसलं पाहिजे. तेव्हाच त्यांच्या नात्यावर लोकांना विश्वास बसेल.'' असं रंजना जैन यांनी सांगितलं.


अंकिता सून म्हणून आम्हाला कधीच पसंत नव्हती असं धक्कादायक वक्तव्य विकी जैनच्या आईने केलं आहे. आता विकी जैनच्या आईच्या या वक्तव्यांनंतर अजून कोणता नवा वाद निर्माण होतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या बिग बॉस शो चांगलाच रंगलाय. आता प्रेक्षक या शोच्या फिनालेची वाट आतुरतेने पाहत आहे. बिग बॉस १७ची ट्रॉफी कोणत्या स्पर्धकाच्या हाती पडते हे पाहण्यासाठी प्रेक्षक सध्या आतुर असल्याचं दिसत आहे.