मुंबई : 'बिग बॉस 3' या मराठी रिअॅलिटी शोचं जेतेपद विशाल निकम याच्या नावे करण्यात आलं आहे. जय आणि विशाल निकम यांच्यामध्ये अटितटीचा सामना रंगला, पण अखेर विजेतेपदाचा मान मात्र विशाललाच मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षकांचं प्रेम आणि कमालीची व्ह्यूअरशिप मिळालेल्या या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा अनेकांनी पाहिला. सोशल मीडियावरुन याची प्रचिती आली. 



विशालला मिळालेल्या बक्षीसामध्ये 20 लाख रुपये आणि विजेतेपदासाठीची ट्रॉफी यांचा समावेश आहे. 


कार्यक्रमात जय दुधाणे याच्या नावे उपविजेचेपदाचं बक्षीस देण्यात आलं. 


काय आहे बक्षीसाचं स्वरुप... 
बिग बॉसच्या विजेत्याला मानाची ट्रॉफी आणि ठराविक रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाते. याआधी ही रक्कम 25 लाख रुपये इतकी होती. 


पण, कालांतराने हा आकडा 20 लाखांवर आणण्यात आला. 


मुळात स्पर्धकाच्य़ा वाट्याला आलेल्या जेतेपदासोबतच मिळणारी लोकप्रियता ही कोणत्याही परिमाणात मोजता येणार नाही अशीच आहे. 


जिम ट्रेनर ते बिग बॉसचा विजेता.. विशालचा प्रवास 
मुळच्या सांगलीच्या असणाऱ्या विशालनं सुरुवातीपासूनच अभिनयाच रस दाखवला होता. 


मास्टर इन फिजिक्सची पदवी असणाऱ्या विशालनं सुरुवातीला एका जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून काम सुरु केलं. 


दख्खनचा राजा ज्योतिबा, या मालिकेनं त्याला खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आणलं. 


आवड जपत, त्यासाठी सवड काढत स्वप्न साकार करणाऱ्या विशालची होणारी प्रसंशा आणि त्याला मिळणारं चाहत्यांचं प्रेम हे त्याच्या हक्काचंच आहे, नाही का?