यंदाचं करवा चौथ हे अभिनेता प्रिन्स नरूला आणि युविका चौधरीसाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरलंय. कारण हे दोघे आई बाबा झाले असून त्यांना गोंडस मुलगी झालीय. बिग बॉस 9 मध्ये हे दोघे प्रेमात पडले. लग्नाच्या 6 वर्षांनंतर यांच्या घरी पाळणा हलला आहे. अनेक प्रयत्नानंतर अभिनेत्री IVF च्या माध्यमातून आई होण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी ही आनंदाची बातमी दिल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आता त्याने हॉस्पिटलमधून लहान परीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. (bigg boss 9 winner and MTV Roadies prince narula yuvika chaudhary become parents baby girl first photo )


युविका चौधरीने तिच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की, ती खूप दिवसांपासून बाळासाठी प्रयत्न करत होती. जून 2024 मध्ये तिने घोषणा केली होती की ती आई होणार आहे. त्यांना रविवारी 20 ऑक्टोबरला मुलगी झाली. रोडीज ऑडिशन दरम्यान प्रिन्स नरुलाने वडील झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली, पण कामामुळे तो पत्नी युविकासोबत नव्हता. करवा चौथच्या निमित्ताने तिने पती प्रिन्सला जगातील सर्वात मौल्यवान भेट दिली.


बाळाची पहिली झलक दाखवणारा पहिला फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता करवा चौथ असल्याने युविकाचा हातावर मेहंदी आहे. शिवाय ती हॉस्पिटलमधील कपड्यामध्ये दिसतंय. तर प्रिन्सने आपल्या लेकीचा जवळ घेतलं. पण या फोटोमध्ये त्यांनी लेकीचा चेहरा दाखवला नाही. लेकीच्या चेहऱ्यावर बाळाचा स्माइली लावली आहे. 



प्रिन्सने युविकाला नॅशनल टीव्हीवर प्रपोज केलं होतं. ह्रदयाच्या आकाराची चपती बनवून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. युविका आणि प्रिन्स 2018 साली लग्नाच्या बंधनात अडकलेत.