मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री नागिन आणि बिग बॉस फेस अभिनेत्री आशका गोराडिया सध्या तिच्या फिटनेसबाबत चर्चेत आहे. आशका अनेकदा योगासनं करतानाचे फोटो शेअर करत असते. मात्र आता तिने शेअर केलेल्या फोटोची खास चर्चा आहे. नुकताचं आशकाने टॉपलेस शीर्षासन करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. आशका गोराडियाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशकाच्या या फोटोला कलाविश्वातील कलाकरांचीही पसंती मिळत आहे. आशकाने हा फोटो शेअर करत भारतातील लैंगिकता आणि त्यावर केल्या जाणाऱ्या आक्षेपाबाबत लिहिलं आहे. त्यासोबतच पुरुषांच्या मानसिकतेबाबतही सवाल केला आहे. 



आशकाने तिच्या संपूर्ण पोस्टमध्ये, महिला या देवाची सर्वोत्तम कलाकृती असल्याचं सांगत, आपला मुद्दा प्रखरपणे सर्वांसमोर मांडला आहे.


याआधीदेखील आशकाने तिचे, तिच्या पतीसोबतचे योगासनं करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. 




आशका पहिल्यांदा टेलिव्हिजन मालिका 'कुसुम'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर 'लागी तुझसे लगन' या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती. 


आशका बिग बॉस सीजन 6 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या सीजनमध्ये आशका चांगलीच चर्चेतही होती. 


आशका डिसेंबर 2017 मध्ये बॉयफ्रेंड ब्रेंट ग्लोबसोबत विवाहबंधनात अडकली.