`Bigg Boss Marathi` च्या नव्या पर्वाला प्रेमाचा तडका; पाहा रुचिरा आणि रोहितची Pyaar Wali Love Story
जाणून घ्या, रुचिरा आणि रोहितची लव्ह स्टोरी...
मुंबई : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत असलेला शो म्हणजे 'बिग बॉस'. 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi) 4 पर्व सुरु झालं आहे. यंदाचं पर्व हे मागच्या 3 पर्वांपेक्षा खास आहे. यंदाच्या वर्षाची थीम ही ऑल इज वेल आहे. यावेळी शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना घेतलं आहे. यातच बिग बॉस मराठीच्या आजवरच्या सीझनमधली पहिलीच कपल एन्ट्री (Couple Entry))यंदाच्या सीझनमध्ये दाखल झाली आहे. (Bigg Boss Marathi 4)
आणखी वाचा : 'तुम लोगो ने मेरी बीवी को...', मिलिंद गवळीला पाहून शेजारी संतापला
'बिग बॉस मराठी'नं काही दिवसांपूर्वी एका बोल्ड जोडीचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. ती जोडी नेमकी कोण असणार याबद्दलचा खुलासा आता झाला आहे. ही बोल्ड जोडी म्हणजे अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) आणि तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे (Dr Rohit Shinde). माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखली जाते. या मालिकेत रुचिरानं माया ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली.
आणखी वाचा : 'माझ्या एका हातात राधिका तर, दुसऱ्या...', सैफ अली खानचं वक्तव्य चर्चेत
आणखी वाचा : Rakhi Sawant बॉयफ्रेंडवर बरसली, म्हणाली, नल्ला आहे तो...
शोमध्ये आल्यानंतर महेश मांजरेकरांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमची ओळख कशी झाली. त्यावर उत्तर देत रोहित म्हणाला, ‘प्रेम करायला शोधायची गरज नसते, ते आपोआपच भेटते.’ तर पुढे रुचिरा म्हणाली, ‘मी आणि रोहितनं आम्ही एकत्र एक शूट केलं होतं. तेथे काही मित्रही ओळखीचे होते.’ (Bigg Boss Marathi 4 Actress Ruchira Jadhav And Boyfriend Dr Rohit Shinde Love story)
बातमीची लिंक : दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठीही पैसे नाहीत; अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक
रुचिराने रोहितच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रेमाची कबुली दिली होती. रुचिरा आणि रोहित हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. रुचिराच्या बहिणीच्या लग्नातही त्याने हजेरी लावली होती. पण त्यावेळी रुचिराने ही बाब गुलदस्त्यात ठेवली होती. रोहित हा पेशाने डॉक्टर आहे. रोहितला मॉडेलिंगची आवड आहे. रोहितनं ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे. रोहितनं अनेक ब्रँडसाठी रॅम्पवॉकही केले आहे. रोहितला फिटनेसची विशेष आवड आहे. फक्त फिटनेस नाही तर त्याला भटकंती करण्याची फार हौस आहे.