मुंबई : बिग बॉसचं पहिलं मराठी पर्व सुरू झालं आहे. हळूहळू हा खेळ रंगायला सुरूवात होणार आहे. मात्र सध्या मराठी कलाकार भविष्यात वाढणारा ताण, चिडचिड आटोक्यात ठेवण्यासाठी सुरूवातीपासूनच तयारी करत आहेत.  


कशी होते सुरूवात ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी बिग बॉसच्या घरात कलाकार व्यायाम, योगसाधनेच्या मदतीने दिवसाची सुरूवात करत आहेत. राजेश शृंगारपुरे हा फीटनेस फ्रिक आहे. नियमित सकाळी राजेश सोबत अस्ताद काळे, रेशम टिपणीस सह अनेक स्पर्धक त्याच्यासोबत नियमित व्यायाम करत आहेत. योगासनं करत आहेत.  


योगासनासोबतच घरातील मंडळी स्विमिंगचाही आनंद लूटत आहेत.


बिग बॉसच्या घरात 15 कलाकार  


बिग बॉसच्या घरामध्ये राजेश शृंगारपुरे, अस्ताद काळे, रेशम टिपणीस, विनीत बोंडे, मेघा थाडे, उषा नाडकर्णी, आरती सोळंकी, भूषण कडू, ऋतुजा धर्माधिकारी, स्मिता गोंदकर, सई लोकूर, सुशांत शेलार, जुई गडकरी,पुष्कर जोग हे कलाकार आणि अनिल थत्ते हे माजी पत्रकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. 


पहिल्याच आठवड्यात विनित बोंडेला नियतीचा कौल म्हणून कॅप्टनपद पदरात पडले आहे. तर नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये उषा नाडकर्णी, आरती सोळंकी, भूषण कडू, ऋतुजा धर्माधिकारी, स्मिता गोंदकर आणि अनिल थत्ते यांच्या नावाचा समावेश झाला आहे. अन 'या' अ‍ॅनिमेटेड व्हिडिओतून नरेंद्र मोदींंनी सांगितले त्यांंच्या फीटनेस एक रहस्य