Bigg Boss OTT 3 Fans Spot Black Snake Inside House : 'बिग बॉस OTT 3' हा शो सुरु झाल्यापासून सतत चर्चेत आहे. स्पर्धकांमुळे चर्चेत आहे. नुकत्याच कानशिलात लगावण्यात आल्या प्रकरणात सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. इंटरनेटवर काही लोक हे विशालला तर काही अरमानच्या बाजूनं आहेत. या सगळ्याच बिग बॉस OTT च्या घरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉस OTT चं 24 तास टेलीकास्ट हे जियो सिनेमावर सुरुच असतं आणि याच लाइव्ह फीडमध्ये असं काही भयानक पाहायला मिळत आहे. ज्याच्यानंतर शोच्या निर्मात्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात साप फिरताना दिसला आहे. आता सापचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाची चिंता वाटू लागली आहे. स्पर्धकांच्या सुरक्षेला घेऊन चाहत्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेटकऱ्यांनी रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 



सध्या सोशल मीडियावर बिग बॉस OTT च्या घरातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. गार्डन एरियामध्ये गवतात तो साप सरपटताना दिसतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लवकेश कटारियाचा हात बांधला असून तो जमिनीवर बसल्याचे दिसते. तर यावेळी लवकेशला थोडाही अंदाज नसतो की बिग बॉसच्या घराच्या आत साप आला आहे. तो त्याच्या रोजच्या गोष्टींमध्ये अडकल्याचे दिसते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बिग बॉसच्या सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'साप घराच्या आत कसा येऊ शकतो? ही एक मोठी समस्या आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'निर्मात्यांनी स्पर्धकांच्या सुरक्षेचा विचार करणं महत्त्वाचं आहे. ही खूप भयानक परिस्थिती आहे.'


हेही वाचा : अंबानींच्या पार्टीत रणवीर सिंगचा कुर्ता कोणी फाडला?


दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लगेच जियोच्या टीमनं सांगितलं की ही क्लिप एडिट करण्यात आली आहे आणि घरात कोणताही साप नव्हता. यंदाच्या सीझनविषयी बोलायचे झाले तर साई केतन राव, चंद्रिका दीक्षित, नैजी, सना सुल्तान, लवकेश कटारिया, विशाल पांडे, रणवीर शौरी, अरमान मलिक, सना मकबूल, दीपक चौरसिया, क्रितीका मलिक, शिवानी यांनी शोमध्ये स्पर्धक म्हणून एन्ट्री केली. तर पायल मलिक, पहलवान नीरज, मुनीषा खटवानी आणि पोलोमी दास यांना शोमधून बाहेर करण्यात आलं.