Bigg Boss OTT 3 Shocking Video: बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला अँडी कुमार म्हणजेच व्हीजे अँडीने विशाल पांड्येला कानाखाली लगावण्यात आल्याच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. अँडीने सोशल मीडियावर एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये पांड्ये आणि लव्हकेश कटारिया अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकला जीम एरियामध्ये व्यायम करताना पाहत असल्याचं दिसत आहे.


अँडीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँडीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कृतिका व्यायाम करत असताना विशाल एक टक तिच्याकडे पाहत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर अचानक तो अरमानकडे पाहून (कृतिकाचा पती) 'भाई भाग्यशाली' ('भावा नशीबवान आहेस') असं म्हणतो. यानंतर विशाल आणि लव्हकेशमध्ये अगदी चुकीचे आणि वाईट संदर्भ देत सूचक शब्दांमध्ये संवाद झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. विशालने अरमानकडे पाहून केलेल्या विधानावर लव्हकेश त्याला रिप्लाय करतो. "मला कळालं," असं लव्हकेश म्हणतो. त्यावर विशाल त्याला, "गप्प बस बाबा, तुला काही लाज वगैरे वाटते की नाही," असं म्हणत गप्प करतो. 


व्हिडीओ शेअर करताना अँडी काय म्हणाला?


हा व्हिडीओ शेअर करताना अँडीने, "हे स्पष्ट दिसत आहे की व्हिडीओतील हे दोघे म्हणजेच लव्ह कटारिया आणि विशाल पांड्येचा हेतू काय होता. आता त्यांच्या आया-बहिणी त्यांची बाजू मांडणाऱ्या पोस्ट करत आहेत. त्याच्या आया-बहिणींना हे सारं दिसत नाही का? जे काही असेल कनाखाली नाही मारु शकत. असं असेल तर केलेल्या कराराला काय किंमत राहिली?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. 


नक्की पाहा हे फोटो >> 'घाणेरडी पॉ* मानसिकता, तू नरकात मरशील'; अश्लील कमेंट करणाऱ्याला रितेशच्या अभिनेत्रीनं सुनावलं


 



दोघांमध्ये हाणामारीपर्यंत गेला विषय


दरम्यान, 'विकेंड का वार' भागामध्ये आधीची स्पर्धक आणि अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने सरप्राइज देत अचानक घरात एन्ट्री घेतली. तिने विशालला कृतिकासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन झापलं. नंतर अरमानने या प्रकरणावरुन विशालशी चर्चा करताना लव्हकेशला विशाल काय बोलला होता याबद्दल विचारलं. त्यानंतर विशाल आणि अरमानमध्ये वाद झाला आणि अरमानने रागाच्याभरात विशालच्या कानाखाली मारली. 



सध्या बिग बॉस ओटीटीच्या घरातील दोन स्पर्धकांमधील हा हाणामारीपर्यंतचा वाद चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय.