मुंबई : 'बिग बॉस ओटीटी' शो संपल्यानंतर आता सर्वत्र 'बिग बॉस 15'ची चर्चा आहे. दरम्यान बिग बॉस विनरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विनर किन्नरच्या भूमिकेत दिसत आहे. बिग बॉसची ही विनर दुसरी तिसरी कोणी नसून अभिंनेत्री विनर दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) आहे. दिव्याला या स्थितीमध्ये पाहून अनेकांना विश्वास देखील बसणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून दिव्याचे असे वेग-वेगळ्या भूमिकेतील फोटो व्हायरल होत आहेत. हे सर्व तिच्या आगामी वेब सिरीजचे पात्र आहेत. ऑल्ट बालाजीच्या वेब सीरिज 'कार्टेल' मध्ये दिव्या अग्रवाल अनेक वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसणार आहे. तिने सीरिजमध्ये सिरियल किलरची भूमिका साकारली आहे.



आता व्हायरल होत असलेल्या  फोटोमध्ये दिव्या किन्नरच्या भूमिकेत दिसत आहे. दिव्या बद्दल सांगायचं झालं तर ती सध्या तिच्या 'कार्टेल' सीरिजमुळे चर्चेत आहे. दिव्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. दिव्या सोशल मीडियावर देखील कायम ऍक्टिव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.