मुंबई : 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT)  संपल्यानंतर आता 'बिग बॉस 15' सुरू होणार आहे. दरम्यान 'बिग बॉस' विनरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ही विनर रुग्णालयातील फर्शी पुसताना दिसत आहे. फोटो पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. पण फोटोमध्ये नक्की कोण आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 'बिग बॉस' विनरच्या या फोटोमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णालयात फर्शी पुसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'बिग बॉस ओटीटी' विनर दिव्या अग्रवाल आहे.  खुद्द दिव्यावे सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'सीरियल किलर वाइब्स... या 'कार्टेल'वर माझा पहिला दिवस.....' असं लिहिलं आहे. ऑल्ट बालाजीच्या वेब सीरिज 'कार्टेल' मध्ये दिव्या अग्रवाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 



दिव्या फोटोमध्ये एका वृद्ध महिलेच्या गेटअपमध्ये दिसत आहे. दिव्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे.