मुंबई : टीव्हीवरील सर्वात चर्चेत असलेला शो म्हणजे बिग बॉस 15 आहे. बिग बॉस 15 च्या विजेत्याचं नाव लीक झाल्याची चर्चा आहे. अंतिम फेरीत करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे. बिग बॉस 15 च्या 5 स्पर्धकांनी 3 महिन्यांहून अधिक काळ घरात घालवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम फेरीमध्ये ट्रॉफी मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. दरम्यान, विजेत्याच्या नावासह एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 



अंतिम फेरीचा निकाल लागण्याआधीच विजेत्याचं नाव लीक झाल्याची एका फोटोमुळे रंगली आहे. विकिपीडिया पेजचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये प्रतिक सहजपाल बिग बॉस 15 चा विजेता आणि शमिता शेट्टी उपविजेती असल्याचा दावा करण्यात आला होता. याशिवाय विजेत्यांना 50 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याचा दावाही या फोटोमध्ये करण्यात आला आहे. 


यापूर्वी देखील असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी करण कुंद्रा विजेता तर  तेजस्वी प्रकाश उपविजेता असल्याचा दावा करण्यात आला होता. या फोटोमध्ये किती सत्य आहे ते आज रात्री समजणार आहे. 


विजेता कोण यासाठी प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. बिग बॉसच्या 15 व्या सीझनचा शेवट आज होणार असून लवकरच नावाची घोषणा करण्यात येईल असं सांगितलं जात आहे.