Ekta Kapoor : निर्मात्या एकता कपूर (Ekta Kapoor) या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मात्र आता एकता आणि त्यांची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्याविरोधात अटक वॉरंट (arrest warrant) जारी करण्यात आलं आहे. यामुळे एकता कपूर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बिहारच्या (Bihar court) बेगुसराय येथील न्यायालयाने एकता यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. एका वेब सीरिजमधल्या (web series) वादग्रस्त दृश्यांमुळे कोर्टाने एकता कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील बेगुसराय येथील न्यायालयाने एकता कपूर आणि त्यांची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट एकता कपूर यांच्या XXX (XXX Season-2) वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह दृश्यांच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यात काढण्यात आलं आहे. बेगुसराय न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या कोर्टातून हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.


'ट्रिपल एक्स सीझन 2' या वेब सीरिजमुळे एकता कपूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या मालिकेत 2 सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. जेव्हा सैनिक त्यांच्या कामावर जातात तेव्हा त्यांच्या पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवतात, असं या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. 6 जून 2020 रोजी माजी सैनिक शंभू कुमार यांच्या वतीने याबाबत न्यायालयात तक्रार पत्र दाखल करण्यात आले होते. याबाबत इतरही आजी-माजी सैनिकांमध्ये नाराजी असून त्यांच्या वतीने तक्रार पत्र देण्यात आलं आहे.


एकता कपूर आणि शोभा कपूर यांना या प्रकरणी फेब्रुवारी 2021 रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. माजी सैनिकांच्या वतीने न्यायालयात तक्रार पत्र दाखल करून आक्षेप घेण्यात आल्याचे या खटल्यात बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले. आता न्यायालयाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. अधिवक्ता हृषिकेश पाठक यांनी सांगितले की, 524/C 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.