बिल गेट्सने अक्षय कुमारच्या `या` सिनेमाचं केलं भरभरून कौतुक
सप्टेंबर महिन्यात रिलिज झालेल्या अक्षय कुमारच्या `टॉयलेट एक प्रेम कथा` होतंय भरभरून कौतुक.
मुंबई : सप्टेंबर महिन्यात रिलिज झालेल्या अक्षय कुमारच्या "टॉयलेट एक प्रेम कथा" होतंय भरभरून कौतुक.
या सिनेमांत भारताच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमांत अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर असून या दोघांनी पंतप्रधान मोदींच्या अभियानावर हा सिनेमा साकारला आहे.
या सिनेमाची कथा क्रिटिक्ससोबतच प्रेक्षकांना देखील भरपूर आवडली. एवढंच नाही तर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमा केला. या सिनेमाचं बजेट हे 18 करोड होतं आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन 216.58 करोड इतकं राहिलेलं आहे. या सिनेमाचं कौतुक बिल गेट्स यांनी देखील केलेलं आहे. सिनेमाची प्रशंसा करताना त्याने ट्विट केलं आहे की, टॉयलेट एक प्रेम कथा, न्यूली मॅरीड कपलवर आधारित बॉलिवूड रोमँटिक सिनेमा आहे. ज्यामध्ये दिग्दर्शकाने भारतातील स्वच्छतेशी जोडलेल्या गोष्टी सांगितल्या.
बिल गेट्स यांनी या सिनेमावर लिहिलेल्या एका आर्टिकलला शेअर केलं आहे. या आर्टिकलमध्ये अक्षयच्या सिनेमाच्या बाबतीत सांगितलं आहे. भारतातील सेनिटेशनची समस्या या सिनेमांत दाखवण्यात आली आहे.