Bipasha Basu Baby Shower: बिपाशा बसूच्या बेबी शॉवरचे रोमँटिक फोटो आले समोर
आकर्षक सजावट...केक कटींग...डिप नेक गाऊन घालत बिपाशाने असा साजरा केला बेबी शॉवर, फोटो पाहिलेत का तुम्ही ?
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाषा बसू (Bipasha Basu) लवकरच आई होणार आहे. आज तिचा बेबी शॉवरचा (Baby Shower) कार्यक्रम पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या बेबी शॉवरचे फोटो आता समोर आले आहेत.
बिपाशा बसू (Bipasha Basu) लवकरच आई होणार असून नुकतीच तिने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. आज मुंबईत तिचा बेबी शॉवरचा सोहळा पार पडला. या बेबी शॉवरचे फोटो आता समोर आले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
मुंबईच्या लोअर परेल येथील एका मॉलमध्ये या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बिपाशा (Bipasha Basu) आणि करणचे कुटुंबीयांसह त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या कार्यक्रमस्थळी सुंदर सजावट करण्यात आली होती.
लुकची चर्चा
बिपाशा बसूने बेबी शॉवरसाठी आरामदायक पोशाख निवडला होता. बिपाशा बेबी पिंक मॅक्सी गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे, करण सिंग ग्रोव्हर निळ्या रंगाच्या सूटमध्ये जेंटलमन दिसत होता. दोघेही फोटोंमध्ये खुप आनंदी दिसत आहेत.
बिपाशा बसू आणि करणने केक कापून हा आनंद साजरा केला. केक कापल्यानंतर त्यांनी मीडियासमोर जोरदार पोजही दिल्या. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासारख होतं.
लिहली खास पोस्ट
दरम्यान 16 ऑगस्ट रोजी बिपाशा बसूने एक खास फोटो शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने गरोदर होण्याची माहिती दिली होती. यानंतर एका मुलाखतीत बिपाशाने सांगितले होते की, ती आणि करण खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते आणि आता ती वेळ आली आहे.
बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan singh grover) दोघेही खूप उत्साहित आहेत आणि त्यांना त्यांचा वेळ पूर्णपणे मुलाला द्यायचा आहे, त्यामुळेच बिपाशा सध्या कोणताही प्रोजेक्ट हातात घेत नाहीये. सध्या तिचे लक्ष तिच्या मुलावर आहे.