मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बिपाशा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या बिपाशा ही तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान बिपाशाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा आहे. पाहा व्हिडीओ... (Bipasha basu pregnancy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिपाशाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, एप्रिल 2016 साली बिपाशा आणि करण (karan singh grover) विवाहबंधनात अडकले होते. कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत अगदी खासगी पद्धतीने दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता. लग्नानंतर अनेकदा बिपाशा गरोदर असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र आता बिपाशाने बेबी बम्पसह फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


‘अलोन’ (Alone) सिनेमाच्या वेळी बिपाशा आणि करणची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. करणचं बिपाशासोबतच हे तिसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न केलं होतं. मात्र ही दोन्ही लग्न फार काळ टिकू शकली नाहीत. बिपाशाला एक वर्ष डेट केल्यानंतर करण आणि बिपाशाने लग्न केलं. दोघांच्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत.


बिपाशा आणि करण सध्या बॉलिवूडपासून दुरावले आहेत. ‘कुबूल है 2.0‘ मध्ये करण ग्रोवर झळकला होता. तर बिपाशा ‘डेंजरस’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. दोघंही सोशल मीडियावर मात्र चांगलेच सक्रिय असतात.