नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राॅय हीचा आज ४४ वा वाढदिवस आहे. निळसर डोळे असलेली ही अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी जगभरात ओळखली जाते. या सौंदर्यवतीचा जन्म १ नोव्हेंबरला कर्नाटक येथील बंगळूर येथे झाला. आज तिने वयाची ४४ वर्ष पूर्ण केली असली तरी तिचे सौंदर्य कमी झालेले नाही. शाळेत असल्यापासूनच ऐश्वर्याला मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. तिने नववीत असताना तिची पहिली अॅड फिल्म केली. ती पेन्सिलची अॅड होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


१९९४ मध्ये ती 'मिस वर्ल्ड' झाली.  या स्पर्धेत जगभरातील ८७ देशाच्या मॉडेल्स सहभागी झाल्या होत्या. त्या सगळ्यांना मागे टाकत ऐश्वर्याने 'मिस वर्ल्ड' चा 'किताब पटकावला.



त्यानंतर तिने १९९७ आपल्या बॉलिवूड करिअर करीअरची सुरुवात केली.



तामिळ चित्रपटात काम केल्यानंतर तिने बॉबी देओल सोबत 'और प्यार हो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ऐश्वर्याने बॉलिवूड नव्हेच हॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली. 



कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी होणारी ऐश्वर्या ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. 



२००७ मध्ये तिने अभिषेक बच्चन सोबत विवाह केला. त्यापूर्वी तिचे नाव सलमान खान आणि विवेक अबोरॉय सोबत देखील गेले होते. 



ऐश्वर्या क्लासिकल डान्सर आहे. उमरावजान, देवदास, जोधा अकबर यांसारख्या चित्रपटातून तिने आपल्या शास्त्रीय नृत्याची झलक दाखवली आहे.


 


२००९ मध्ये ऐश्वर्याला पदमश्री देऊन सन्मानित करण्यात आले. 




२०११ मध्ये ऐश्वर्याने एका गोंडस सुंदर मुलीला जन्म दिला. तिचे नाव आराध्या ठेवण्यात आले.