Leena Chandavarkar Birthday : किशोर कुमार यांच्या गाण्यांचे आपण आजही तितकेच मोठे फॅन्स आहोत. 70-80 च्या दशकात किशोर कुमार यांनी आपल्या गाण्याची आणि आवाजाची जादू कायम ठेवली होती. जितके ते आपल्या व्यावसायिक आयुष्याबद्दल चर्चेत राहायचे तेवढेच ते आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखले जायचे. किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केले. त्यांच्या आयुष्यात विविध टप्प्यावर चार वेगवेगळ्या स्त्रिया आल्या होत्या. त्यातल्याच एक होत्या त्यांच्या पत्नी लीना चंदावरकर. लीना चंदावरकर या मराठीमोळ्या घरातल्या हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. आज (29, ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस आहे. त्या 73 वर्षांच्या असून हिंदी सिनेसृष्टीपासून दूर आहेत. आज आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. खरंतर लीना चंदावरकर यांचे नाव प्रथम घेतले की आपल्या डोळ्यासमोर किशोर कुमार आणि त्यांचेच नाव येते. 1980 साली त्यांनी किशोर कुमार यांच्यासमवेत लग्न केले. त्यानंतर किशोर कुमार यांचे 1987 साली आकस्मिक निधन झाले आणि त्यामुळे त्यांचा एकमेकांसोबतच वैवाहिक सहवास हा सात वर्षांचाच राहिला. 


लीना चंदावरकर कोण आहेत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

70 च्या दशकात हेमा मालिनी यांची क्रेझ फार मोठी होती. आजच्या काळात ज्या प्रमाणे अभिनेत्रींची क्रेझ असते. तेवढीच क्रेझ ही त्यांचीही होती. लीना यांच्या सौंदर्याच्याही अनेकदा चर्चा रंगायच्या. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकमधील धारवाड येथे एका कोंकणी मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीनाथ चंदावरकर हे एक सैन्य अधिकारी होते. त्यांनी फिल्मफेअरद्वारे आयोजित करण्यात आलेल्या फ्रेश फेस ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी या स्पर्धेत दुसरे पारितोषिक पटकावले होते. त्यानंतर त्यांच्या मॉडेलिंगच्या करिअरला वेग मिळाला होता. 


अशा बनल्या सुपरस्टार


मॉडेलिंग करता करता लीना चंदावरकर या बॉलिवूडमध्येही स्थिरावल्या. त्यांचा पहिला चित्रपट 1967 साली होणारा 'मसीहा' हा होता. त्यांनी या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. परंतु काही कारणास्तव या चित्रपटाची शुटिंग पुर्ण झाली नाही. सुनील दत्त यांचा हा चित्रपट होता. मसीहा हा चित्रपट बंद झाल्यानं सुनील दत्त यांनी त्यांना 'मीत' या चित्रपटात घेतले आणि मग त्या या चित्रपटानंतर फार मोठ्या प्रमाणात स्टार झाल्या. 


त्यांनी तेव्हा फार मोठमोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केले होते. त्यामुळे त्यांची तेव्हा चांगलीच चर्चा होती. विनोद खन्ना, राजेश खन्ना, दिलीप कुमार, जितेंद्र यांच्यासारख्या सुपरस्टार हिरोंसोबत त्यांनी काम केले होते. त्यामुळे तेव्हा त्यांचे नावं हे सुपरस्टार अभिनेत्रींमध्ये मोडले गेले. 


खळबळजनक वैयक्तिक आयुष्य


लीना चंदावरकर यांनी वयाच्या 24 व्या वर्षी सिद्धार्थ बंडोडकर यांच्यासोबत विवाह केला होता. त्यांचं हे अरेंज मॅरेज होतं. त्यांचे पती ही राजकारणी परिवारातील होते. परंतु त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पतीला गोळी लागली होती. बंदूक साफ करता करता त्यांना ही गोळी लागली होती. त्यामुळे त्यांचा संसार हा फक्त 11 महिनेच राहिला होता. त्यावेळी त्यांच्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता. 


किशोर कुमार यांची साथ, प्रेम आणि लग्न


किशोर कुमार यांच्यासोबत लीना चंदावरकर यांची जवळीक वाढली. ते एकमेकांशी लग्न करायलाही तयार झाले होते. परंतु त्यांचे हे लग्न लीना यांच्या वडिलांना पसंत नव्हते. याचे एक कारण म्हणजे किशोर कुमार यांचे तीन वेळा लग्न तुटले होते आणि दुसरं कारणं होतं ते म्हणजे किशोर कुमार हे लीना यांच्या 20 वर्षांनी वयानं मोठे होते. लीना यांच्या वडिलांना मनवण्यासाठी किशोर कुमार त्यांच्या घराबाहेर 'नफरत करने वालों के दिल में प्यार भर दूं' हे गाणं गायचे. त्यांनी आधी कोर्ट मॅरेज केले होते आणि मग लीना या गरोदर होत्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले. त्यानंतर किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांची साथ सुटली.