मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा याचा आज ४४ वा वाढदिवस आहे. हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम सिनेमात त्याने काम केले आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रभुदेवा याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याचे चाहते त्याला भारतातील मायकल जॅक्सन मानतात. त्याला दोनदा बेस्ट कोरियोग्राफरचा नॅशनल फिल्म अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. प्रभुदेवा यांचा जन्म ३ एप्रिल १९७३ मध्ये कर्नाटकातील मैसूर येथे झाला. त्यांचे वडील मुरुग सुन्दर हे साऊथ मधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक होते. त्यांच्याकडूनच प्रभूदेवाने नृत्याचे धडे घेतले. २००९ मध्ये बॉलिवूडच्या वॉन्टेड सिनेमातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर रावडी राठोड, अॅक्शन जॅक्शन, दबंग ३ यांसारखे सिनेमांचे दिग्दर्शक केले.


वादग्रस्त ठरले वैयक्तिक आयुष्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्य फारच वादग्रस्त आहे. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा हिच्यामुळे प्रभुदेवा यांचे लग्न मोडले.
नयनतारा हिचे प्रभुदेवा यांच्यावर खूप प्रेम होते. या प्रेमापोटी तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. अनेक वर्ष हे दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते.


मात्र प्रभुदेवा यांचे रामलता यांच्याशी लग्न झाले होते. या दोघांचे संबंध उघडकीस आल्यानंतर नाराज झालेल्या लता यांनी २०१० मध्ये फॅमेली कोर्टात याचिका दाखल केली. त्याचबरोबर नयनतारापासून दूर राहण्यासाठी प्रभुदेवावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र त्यामुळे प्रभुदेवा यांच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे हा वाद विकोपाला गेला आणि लता यांनी उपोषणाची धमकी दिली. तर अनेक महिला संघटनांनी नयनताराविरोधात आवाज उठवला.


२०११ मध्ये प्रभुदेवाने आपल्या पत्नी लता यांना घटस्फोट दिला. मात्र त्यानंतर नयनतारा यांनी मीडियाला सांगितले की, प्रभुदेवा आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत.