मुंबई : सुपरहिट सिनेमा ‘बाहुबली २’ ने जगभरात अनुष्का शेट्टीला एक नवीन ओळख मिळवून दिली. आज अनुष्का तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काचा जन्म ७ नोव्हेंबर १९८१ मध्ये मॅंगलोर, कर्नाटकमध्ये झाला होता. तिचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे. ‘बाहुबली’ मध्ये प्रभास आणि अनुष्काच्या जोडीला मोठी पसंती मिळाली. त्यानंतर आता तिच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. चला आज जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी....



अनुष्काने तिच्या करिअरची सुरूवातीए २००५ मध्ये ‘सुपर’ या सिनेमाने केली होती. अनुष्काच्या कुटुंबियापैकी कुणीही सिने इंडस्ट्रीत नाहीत. सिनेमात करायला सुरूवात करण्याआधी ती एक यशस्वी योगा टीचर होती. अनुष्काचं सौंदर्य पाहून एका दिग्दर्शकाने तिला सिनेमाची ऑफर दिली होती. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये ती दिसली. 


अनुष्काचा ‘साईज झीरो’ हा तिच्या सर्वात खास सिनेमांपैकी एक मानला जातो. या सिनेमासाठी अनुष्काने आपलं २० किलो वजन वाढवलं होतं. 



अनुष्का इंटेक्स अ‍ॅक्वा स्मार्टफोनची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर राहिली आहे. २०१० मध्ये अनुष्काने तमिळ सिनेमा ‘सिंघम’ मध्ये काम केल्यावर प्रेक्षकांना मोहिनी घातली होती. ‘सिंघम २’ मध्येही तिने दमदार काम केलं होतं. 



अनुष्का शेट्टी हे साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव असून तिकडे ती टॉपची हिरोईन आहे. इतकेच नाहीतर सिनेमासाठी पैसे घेण्याबाबतीतही ती साऊथमधील सर्व अभिनेत्रांच्या कितीतरी पुढे आहे. तशी साऊथ सिनेमातील हिरोईन्सना फि कमी मिळते. पण अनुष्काबाबत तसं नाहीये. अनुष्का ही एका सिनेमासाठी तब्बल चार कोटी रूपये घेते. ‘बाहुबली २’ या सिनेमासाठी अनुष्काने तब्बल ५ कोटी घेतल्याची माहिती आहे.



गेल्या एका दशकापासून आपली जादू चालवणा-या अनुष्काने टॉलीवूडमध्ये २००५ मध्ये डेब्यू केलं होतं. अनुष्काने तिच्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये २० पेक्षा अधिक तमिळ आणि तेलगु सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या नावावर ‘बाहुबली’ आणि ‘रूद्रमादेवी’ सारख्या सिनेमांची नोंद आहे. अनुष्काने माऊंट कार्मल कॉलेज, बेंगळुरू येथून कॉम्प्यूटर अ‍ॅप्लिकेशनमधून ग्रॅज्यूएट केलंय.