मुंबई : बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री हुमा कुरेशीचा २८ जुलै म्हणजेच आज ३२ वा वाढदिवस आहे. हुमाने आपल्या करिअरची सुरुवात गॅंग्स ऑफ वासेपूर या अनुराग कश्यपच्या सिनेमातून केली. हुमाला बॉलिवूडमध्ये ६ वर्ष झाली असून तिने एकापेक्षा एक सरस भूमिका करत बॉलिवूडमध्ये आपले चांगले नाव कमावले आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# हुमा कुरेशीने दिल्ली युनिव्हर्सिटीच्या गार्गी कॉलेजमधून इतिहासात बॅचलर डिग्री घेतली आहे. त्याचबरोबर ती दिल्लीच्या थिएटर ग्रुपशी संलग्न होती.


# सिनेमात येण्यापूर्वी तिने जाहिरातींमध्ये काम केले होते. पिअर्स साबण, सॅमसंग आणि नेरोलेकच्या जाहिरातींमध्ये ती झळकली होती.


# गॅंग्स ऑफ वासेपूर पूर्वी हुमा कुरेशी तामिळ सिनेमा बिला 2 मधून डेब्यू करणार होती. पण सिनेमाला विलंब होत असल्याने हुमाने त्यातून काढता पाय घेतला. 


# सॅमसंगच्या जाहिरातीत हुमा कुरेशीला पाहिल्यावर अनुराग कश्यपने तिला सिनेमात घेण्याचा निर्णय घेतला. आणि हुमा गॅंग्स ऑफ वासेपूरमध्ये झळकली.


# इतकंच नाही तर अनुराग कश्यप आणि कल्की कोचलिन यांच्या घटस्फोटालाही हुमा कुरेशी जबाबदार असल्याची चर्चा होती. अनुराग आणि हुमाच्या वाढत्या जवळीकीमुळे त्या अनुराग-कल्कीच्या नात्यात दरी निर्माण झाली.


# हुमा कुरेशीचे नाव बॉबी जासूसचा अभिनेता अर्जन बजवासोबतही जोडले गेले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही.


# हुमा कुरेशीने आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये सर्व खास भूमिका साकारल्या. पण विशेष बाब ही की, तिने अधिकतर अनुराग कश्यपच्या सिनेमात काम केले आहे. सुजाता सिनेमातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.