मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि सोशल मीडिया दिवा जॅकलिन फर्नांडीसचा आज ३३ वा वाढदिवस आहे. बर्थडे सेलिब्रेशनसाठी जॅकलिन युरोपमध्ये आपल्या आईसोबत गेली आहे. युरोपहून जॅकलिनने काही खास फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# ११ ऑगस्ट १९८५ मध्ये जॅकलिनचा जन्म झाला. २००६ मध्ये तिने मिस श्रीलंका युनिवर्सचा किताब पटकावला. जॅकलिनचे वडील श्रीलंकेत म्युजिशियन आहेत आणि आई एअर हॉस्टेस होती. चार भावंडांपैकी जॅकलिन सर्वात मोठी आहे.



# युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीतून मास कम्यूनिकेशनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जॅकलिनने श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने मॉडलिंग करायला सुरुवात केली आणि २००९ मध्ये मॉडलिंगसाठी ती भारतात आली.



# सुजॉय घोषच्या अलादीन या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. तो सिनेमा फ्लॉप झाला. पण जॅकलिनला सिनेमात काम मिळायला सुरुवात झाली. २०११ मध्ये आलेला मर्डर २ सिनेमा हिट झाला आणि जॅकलिनला ओळख मिळाली. त्यानंतर हाऊसफुल २ आणि रेस ३ मधील तिच्या कामाचेही कौतुक झाले. 



# त्यानंतर २०१४ मध्ये आलेल्या किक सिनेमाने जॅकलिनला मेन स्ट्रीम अभिनेत्री बनवले. या सिनेमाच्या यशानंतर सलमानने जॅकलिनला बांद्रामध्ये थ्री बएचके फ्लॅट गिफ्ट केला. त्यानंतर जॅकलिनने छोट्या पडद्यावरही आपली कमाल दाखवली. झलक दिखला जा हा रियालिटी शो तिने जज केला. 



# स्पॅनिश, फ्रेंच आणि अरबी बोलणाऱ्या जॅकलिनला बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी हिंदी शिकावी लागली. जॅकलिन प्रिंस हसन बिन राशिद अली खलीफा ला डेट करत होती. हसनशी नाते तुटल्यावर जॅकलिनचे नाव दिग्दर्शक साजिद खानसोबत जोडले गेले. 



# 'जुम्मे की रात', 'एक दो तीन..', 'लत लग गई', ' बीट पर बूटी', ' चिट्टियां कलाइयां', ‘चंद्रलेखा’ ही गाणे अतिशय लोकप्रिय आहेत.



# सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली जॅकलिन फिटनेस फ्रिकही आहे. फिटनेसचे फोटोज व्हिडिओज ती सोशल मीडियावर शेअर करत असते.