मुंबई : चश्मेबद्दूर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री तापसी पन्नूचा आज ३१ वा वाढदिवस आहे. पिंक सिनेमामुळे तापसीला नवी ओळख मिळाली. साऊथ सिनेमांतून करिअरला सुरुवात केलेल्या तापसीने खूप मेहनतीने यश प्राप्त केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पंजाबी कुटुंबातील या मुलीने २०१० मध्ये राघवेंद्र रावचा तेलगू सिनेमा 'झुम्माण्डि नादां' पासून अभिनयातील कारर्दीतीला सुरुवात केली. पण करिअरच्या सुरुवातीला खूप वाईट काळाला सामोरे जावे लागले. एक वेळ अशी ही होती तेव्हा तापसीला सर्वच बॅड लक हिरोईन मानत होते. 



एका मुलाखतीत तापसीने सांगितले की, कॉलेजच्या दिवसात मॉडेलिंग करुन ती पॉकेट मनी कमवत होती. कॅट परिक्षेत ८८% मिळवल्यानंतर एमबीए करण्याच्या विचारात असलेल्या तापसीला अचानक सिनेमाची ऑफर आली. पण त्यानंतर सातत्याने ३ सिनेमे फ्लॉप झाले. तेव्हापासून सर्वच मला बॅड लक अभिनेत्री बोलायला लागले. सिनेमात मोठमोठे अभिनेते होते, उत्तम दिग्दर्शक तरीही सिनेमा फ्लॉप झाल्यावर मला बॅड लकचा टॅग लावण्यात आला.



या टॅगमुळे कोणताही अभिनेता माझ्यासोबत काम करण्यास तयार नव्हता. एका निर्मात्याने सिनेमासाठी मला फायनल केले, शूटिंगच्या तारखा ठरवल्या. पण अचानक मला काढून एका मोठ्या हिरोईनला कास्ट करण्यात आले. अनेकदा मला माझेच पैसे मिळवण्यासाठी लढावे लागले आहे.



सुत्रांनुसार, तापसी लवकरच भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची भूमिका साकारताना दिसू शकते. तापसी देखील मिताली राजची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. आता मुल्क सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पण प्रदर्शनापूर्वीच मुंबई कोर्टाने यावर बंदी घातली आहे. हा सिनेमाची कथा आतंकी घटनांचा कट रचण्याच्या आरोपात अडकलेल्या एका मुसलमान कुटुंबाची आहे.