गुजरात : गुजरात निवडणुकीच्या निकालात भाजपाने बहुमताचा आकडा पार केला. पण राहुल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या कॉंग्रेसने भाजपाला जोरदा टक्कर दिली. 
गुजरातमध्ये १६ जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाल्याचं पहायला मिळालं. काही जागांवर तर विजय-पराभवात केवळ २०० मतांचंच अंतर होतं.


कोणत्या आहेत या जागा ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोलका विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या उमेदवाराचा केवळ ३२७ मतांनी पराभव झाला. या जागेवर बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना क्रमश: ३१३९ आणि ११९८ मतं मिळाली.


फतेपुरामध्ये भाजपने काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा २,७११ मतं अधिक मिळवत विजय मिळवला. याच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला २,७४७ मतं मिळाली.


आदिवासींचे वर्चस्व असलेल्या डेंग्समधील जागेवर काँग्रेस उमेदवाराचा ७६८ मतांनी विजय झाला.


बोटाद मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा केवळ ९०६ मतांनी पराभव झाला. या जागेवर बीएसपीच्या उमेदवाराला ९६६ मतं मिळाली.


तर, तीन अपक्ष उमेदवारांनी जवळपास ७,५०० मतं मिळाली. 
 
गोधरामध्ये भाजप उमेदवाराचा फक्त २३६ मतांनी विजय मिळवला. या जागेवर ३०५० लोकांनी नोटाचा वापर केला तर निर्दलीय उमेदवाराला १८ हजार मतं मिळाली. 


मनसामध्ये भाजप उमेदवाराचा ५२४ आणि दिओदरमध्ये ९३२ मतांनी पराभव झाला.