जोधपूर : अभिनेता सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण पुन्हा डोकं वर काढत आहे. त्यामूळे दबंग सलमानच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. पण त्यासोबतच अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने ही नोटीस बजावली आहे. काळवीट शिकारीसाठी सलमानला उसकवण्यात आल्याचा आरोप या कलाकारांवर करण्यात आला आहे. त्यांच्या सोबत असलेल्या दुष्यंत सिंगला सुद्धा नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी राजस्थान सरकारने मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात याचिका केली होती, त्यानंतर जस्टीस मनोज गर्ग यांच्या खंडपीठाकडून ही नोटीस बजावण्यात आली.   



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील वर्षी ५ एप्रिल रोजी मुख्य न्यायीक दंडाधिकाऱ्यांकडून सैफ, सोनाली, तब्बू आणि निलम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्याविरोधात राज्य सरकार जोधपूर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले होते. 


काळवीट शिकार प्रकरणी बेपत्ता असलेले दिनेश गावरे यांनाही या प्रकरणात आरोपी म्हणून पाहावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. दिनेश गावरे हे ट्रॅव्हल एजंट त्यावेळी सलमानचे असिस्टंट होते. न्यायाधीश मनोज गर्ग यांनी आठ आठवड्यांनंतर या प्रकरणी सुनावणी केली जाईल असे सांगितले आहे.