मुंबई : 'ब्लॅक पँथर' स्टारर अभिनेता चॅडविक बोसमनचं शुक्रवारी निधन झालं आहे. 'ब्लॅक पँथर' चित्रपटात मुख्य भुमिका साकारणाऱ्या चॅडविकने वयाच्या ४३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या ४ वर्षांपासून तो कर्करोगाशी झुंज देत आहे. चॅडविक कोलोन कॅन्सरने त्रस्त होता. चॅडविकच्या निधनाची बातमी त्याच्या मॅनेजरने दिली आहे. त्याने लॉस अँजेल्समधील त्याच्या राहत्या घरी या जगाचा निरोप घेतला. अंतिम समयी त्याचे  कुंटुंब त्याच्यासोबत होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॅडविकने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारल्या. मात्र 'ब्लॅक पँथर' या चित्रपटाने त्याला यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवले. त्याच्या 'ब्लॅक पँथर' चित्रपटाला ऑस्कर या मानाच्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. बोसमनने ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटात सम्राट टी चाला ही भूमिका साकारली होती.


याशिवाय त्याने  ‘42’ आणि ‘Get on Up’ या चित्रपटांमध्ये देखील महात्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर एवेंजर्स-इनफिनिटी वॉर आणि एवेंजर्स-एण्ड गेम मधील त्याच्या 'ब्लॅक पँथर' या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले.