जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. जोधपूरच्या न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. या निकालानंतर सलमान खान जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना झाला आहे. सलमान खानचे जेलमध्ये जातानाचे फोटो झी मीडियाच्या हाती लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


निकालावेळी सलमान झाला भावूक


खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावूक झाला होता.



दोन्ही बहिणी रडल्या


सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहीण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.



इतर सेलिब्रिटी निर्दोष


दरम्यान, सैफअली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आज सकाळी न्यायालयात पोहोचल्यावर सलमान खानने न्यायालयरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभे राहून निर्दोष असल्याचे म्हटले. आरोपींपैकी सर्वात आधी सलमान खान न्यायालयात पोहोचला होता.



१९९९ साली काळविटाची शिकार


१९९९ साली हम साथ साथ है चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना काळविटाची शिकार करण्यात आली होती.